रोजच्या वापरात असणाऱ्या अन्नधान्याच्या आयुर्वेदिक गुणधर्मांची, गुणदोषांची माहिती आपण घेतो आहोत. आज आपण अजुन काही धान्यांची माहिती घेऊ या.
च्या अंकात आपण तांदळाचे गुणधर्म पाहिले. त्यात तांबडा तांदूळ, साठेसाळीचा तांदूळ गुणांनी उत्तम असतो हेही पाहिले. अजून एक सांगायचे म्हणजे तो ज्या जमिनीत तयार होतो त्यानुसारही त्याचे गुण बदलतात.
दग्धायामवनौ जाताः शालयो लघुपाकिनः [...]
आयुर्वेदाच्या इतिहासात एक गोष्ट आहे. जीवक नावाचे एक तरुण वैद्य आपल्या गुरुंकडे आयुर्वेद शिकत होते. ते अतिशय बुद्धिमान होते, गुरुंनी शिकवलेले त्यांना चटकन समजत असे व कायमचे लक्षातही राहत असे. या पद्धतीने सात वर्षे शिक्षण घेतल्यानंतर एक दिवस त्यानी गुरुला विचारले की माझे शिक्षण पूर्ण झाले आहे का नाही हे कसे [...]